पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याने घरी जात एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. २ जुलै रोजी घरी एकटी असतांना संशयित आरोपी हा मुलीच्या घरी जात म्हणाला कि, मी साप पकडला आहे तुला दाखवू का ? असे म्हणून अल्पवयीन मुलीला त्याने बरणीमधून साप दाखविला व पुन्हा थैलीमध्ये ठेवला यानंतर मुलीला विचारू लागला घरातील लोक कुठे गेले आहेत. मुलीने सांगितले सार्वजन बाहेर गेले आहे. तर संशयिताने अल्पवयीन मुलीस म्हणाला कि, माझ्यासोबत फ्रेडशिप करशील का ? तिने यावर नकार दिला असता संशयिताने तिचा हात पकडला तिने कसाबसा हात सोडला त्यानंतर त्याने मुलीला पिण्यासाठी पाणी मागितले पाणी पिल्यावर पुन्हा त्याने अल्पवयीन मुलीस लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याने अल्पवयीन मुलीने दि.४ रोजी पिंपळगाव पोलिसात धाव घेत संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.महेद्र वाघमारे हे करीत आहेत.



