चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील एका उच्चशिक्षित तरुणीचा पाठलाग करून तिला वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून मेसेज करून तसेच तिच्या जमलेल्या लग्नाच्या ठिकाणी खोटे-नाटे सांगून मानसिक त्रास दिल्याबद्दल अमित राजेंद्र शिरुडे (३०, पवारवाडी, चाळीसगाव) याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी तरुणी उच्चशिक्षित असून तिचे २३ जून रोजी लग्न ठरलेले होते. परंतु अमित राजेंद्र शिरुडे याने वेळोवेळी तरुणीला वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून फोन, मेसेज करून तसेच लग्नाच्या ठिकाणी खोटेनाटे सांगून तिचे नियोजित लग्न मोडले. वेगवेगळे मोबाइल नंबर वापरून तिला अमित याने त्रास दिला. याप्रकरणी अमित शिरुडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहायक निरीक्षक दीपक बरारी करीत आहेत.