• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धारदार शस्त्राने वार करीत मोबाईल लांबविला !

रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
July 4, 2023
in क्राईम, जळगाव
0
महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील पिंप्राळा परिसरातील एका परिसरात घरासमोर बसलेल्यांना हटकल्यावरून तिघांनी नीलेश लक्ष्मीनारायण दुबे (वय ४१) यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत त्यांचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल घेऊन पोबारा केला. ही घटना १ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी २ जुलै रोजी अज्ञात तीन जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै रोजी रात्री दुबे यांच्या घरासमोर वाळूच्या ढिगावर तीन जण बसलेले होते. त्यांना दुबे यांनी ‘येथे का बसले आहे?’ असे विचारले असताना तिघांनी तू कोण असा उलट सवाल केला. मी येथेच राहत असल्याचे सांगत दुबे घरात निघून गेले. बसलेल्या तिघांपैकी एकाने दुबे यांना पुन्हा बाहेर बोलवून तू आम्हाला का विचारणा केली, असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने धारदार शस्त्राने मांडीवर दुखापत करीत फिर्यादीच्या शर्टाच्या खिशातून १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी दुबे यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहेत.

Previous Post

प्रेयसीसाठी कापलं पत्नीच नाक अन घडले धक्कादायक !

Next Post

चाळीसगावातील तरुणाने मोडले तरुणीचे लग्न !

Next Post
चाळीसगावातील तरुणाने मोडले तरुणीचे लग्न !

चाळीसगावातील तरुणाने मोडले तरुणीचे लग्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group