जळगाव : प्रतीनीधी
राज्याच्या राजकारणात २ जुलै रोजी मोठी घडामोड होत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यातील अजित पवार समर्थकांनी जोरदार जल्लोष केला तर अनेक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यात जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार देखील अजित पवारांच्या भेटीसाठी मुंबईत पोहचले होते.
आज दि.३ रोजी सकाळी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची देवगिरी या शासकीय बंगल्यावर भेट घेऊन फुलमाळा घालून दादांचा सत्कार केला. यावेळी अजितदादा यांचे जळगाव जिल्ह्यातले कट्टर समर्थक व जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी दादांचे स्वागत केले. त्यांचे सोबत शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख प्राध्यापक संजय पाटील सर, दोनगावचे किशोर पाटील व चोपड्याचे माजी युवक अध्यक्ष सुनील पाटील उपस्थित होते.