लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: यावल तालुक्यातील चुंचाळे येथील दोन भावंडे कालपासून बेपत्ता होते. आज दुपारी दोन्ही भावंडांचे त्यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. यावल पोलीसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
यावल तालुक्यातील चुंचाळे येथील गायरान परिसरात रवींद्र मधुकर सावळे (वय-३५) आणि उज्ज्वला सावळे हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. बुधवारी आई-वडिलांच्या सोबत ही दोन्ही मुले स्वत:च्या चुंचाळे शिवारातील शेत गट नं. ३६५/१ मधील शेतात गेली होती. सावळे दाम्पत्य शेतात काम करत असतांना ही दोन्ही मुले खेळत असल्याने कुणी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. दोन्ही मुले बेपत्ता झाले होते. चुंचाळे शिवारासह नायगाव, सौखेडासीम आदींसह पंचक्रोशीत त्यांचा शोध घेण्यात आला परंतू ते कुठेही आढळून आले नाही. यावल पोलीसात रात्री उशीरा बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.आज दुपारी त्याच शेतातील विहिरीत दोघांचे मृतदेह तरंगतांना आढळून आल्याचे खळबळ उडाली आहे.
माहिती मिळताच नातेवाईकांनी विहिरीजवळ आक्रोश केला यावलचे पो नि सुधीर पाटील, पोउनि जितेंद्र खैरनार, स फौ विजय पाचपोळ आदींनी घटनास्थळी धाव घेतली
बालकांचा चुलत काका मनोरूग्ण असल्याने त्यानेच विहिरीत मुलांना फेकल्याचा अंदाज आहे. त्यामुळे चुलत काकाला चौकशीसाठी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी शेतातील विहिरीजवळ चिंचोली गावातील ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती.