मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती तर त्याला एक वर्ष उलटत नाही तोच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या सोबत सत्तेत एकत्र आले आहे. त्यांनी नुकतेच राष्ट्रवादीच्या 40 आमदारांसोबत राजभवनात दाखल होत उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली आहे.
राज्याच्या राजकारणातील १ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राज्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांना अजित पवारांनी संपर्क साधून त्यांना पहाटेच्या सुमारास मुंबईत बैठक घेण्यात आली होती या बैठकीनंतर थेट 40 आमदारांसह अजित पवार राजभाऊंना दाखल झाले होते यावेळी कुठल्याही ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिसून आले नाही तर त्यांचे निकटवर्ती ही दिसून आलेले नाही. राज्य राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री पदी अजित पवार तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे तब्बल सात ते नऊ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचेही वृत्तसमोर येत आहे.