Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यात दुसऱ्यांदा मोठा भूकंप ; अजित पवार उपमुख्यमंत्री पदी ?
    राजकारण

    राज्यात दुसऱ्यांदा मोठा भूकंप ; अजित पवार उपमुख्यमंत्री पदी ?

    editor deskBy editor deskJuly 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची तयारीत असून आता थेट विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या काही समर्थक आमदारांसह राजभवनाकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राजभवनाकडे रवाना झाले आहेत. अजित पवार आज शिंदे सरकारमध्ये सामील होणार असून मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि इतर आमदारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

    महत्त्वाचे म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार होणार असेल तर आमची संपूर्ण तयारी झाली आहे, अशी महत्त्वाची माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांची शपथविधी होण्याच्या शक्यतांच्या चर्चांना उत आला आहे.
    आज दुपारी दोन वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यात मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील अतुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे हे सर्व नेते सरकारमध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.