Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रस्त्यावरून धूम स्टाईल महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास !
    क्राईम

    रस्त्यावरून धूम स्टाईल महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास !

    editor deskBy editor deskJuly 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरात नियमित सुरु असलेल्या धूम स्टाईल चोर्‍या कुठेही थांबायचे नाव घेत नाही आहे. नुकतेच ५८ वर्षीय महिला पायी चालत असताना धूम स्टाईल येत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख 20 हजार रुपये किंमतीची पोत लांबवल्याची घटना हरेश्वर नगरातील वृंदावन अपार्टमेंटसमोर घडली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अज्ञात दोन चोट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील हरेश्वर नगर परिसरातील वृंदावन अपार्टमेंटमधील रहिवासी ललना चंद्रमोहन टेमकर (वय ५८) या शनिवार १ जुलै रोजी रात्री सव्वाआठ वाजता अपार्टमेंटसमोर उभ्या असताना पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी धूम स्टाईल येत महिलेच्या गळ्यातील 23 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अलगद लांबवली. महिलेने आरडा-ओरड केली मात्र तो पर्यंत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी टेमकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.