धरणगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक गावात जात विकासकामे तसेच नागरिकांच्या भेटी घेण्यात नेहमीच पालकमंत्री गुलाबराव पाटील दिसत असतात. त्यामुळे त्यांच्यावर अनेक कार्यकर्त्यांचे व नागरिकांचे प्रेम आहे. ते प्रत्येकाच्या सुख दुखात नेहमीच तत्पर असल्याने कार्यकर्ते देखील त्यांना आवर्जुन बोलवत असतात. असाच एक प्रसंग धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात आला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आपला दौरा आटोपून घराच्या दिशेने जात असतांना गावातील एका चौकातून पालकमंत्री पाटील जात असतांना एका कार्यकर्त्याचा आवाज आला. गुलाबभाऊ…हा आवाज भाऊंच्या कानावर आला अन भाऊंनी गाडी थांबवत थेट कार्यकर्त्याच्या दुकानाच्या बाहेर बसत आपला दरबारच भरविला कार्यकर्त्यांनी विकासकामाबाबत काही मुद्दे सांगितले व भाऊंनी लागलीच त्यावर अंमलबजावणी केली. हि वार्ता जशी गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली तसे तसे नागरिक भाऊंच्या भेटीसाठी येवू लागले. या नागरीकात एक चर्चा सुरु झाली. मंत्री पदाचा कुठलाही बडे जाव न करता अगदी कार्यकर्त्याच्या दुकानाबाहेर जनता दरबार लावल्याने जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.