धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यात सुरु असलेल्या अवैध वाळू वाहतुकीची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर धरणगाव तहसीलदार यांच्या पथकाने कारवाई केल्याने अवैध वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील मौजे बांभोरी प्र चा येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्र MH19P2400 पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे सदर वाहन हे हितेश हरी कोळी रा बांभोरी प्र चा यांचे मालकीचे आहे सदरची कारवाई श्री महेंद्र सूर्यवंशी तहसीलदार धरणगाव यांचे मार्गदर्शनाखाली अमोल पाटील मंडळ अधिकारी पाळधी प्रविण बेंडाळे मंडळ अधिकारी साळवा व लक्ष्मीकांत बाविस्कर मंडळ अधिकारी सोनवद नारायण सोनवणे कोतवाल बांभोरी प्र चा यांनी केली आहे.