जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका शाळेतील शिक्षिका असणारी महिला रस्त्याने पायी चालत असताना अचानक दुचाकीने दोन जणांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केल्याची घटना शुक्रवारी ३० रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास भगवान नगर मधील किलबिल शाळेजवळ घडली. याबाबत अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुने भगवान नगरातील रहिवासी असलेल्या रोहिणी विजयकुमार नारखेडे (वय-३९) येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला आहे. शुक्रवारी ३० जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रोहिणी नारखेडे या भगवान नगरातील किलबिल शाळेजवळून पायी जात असतांना दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येवून त्यांच्या गळ्यातील ८० हजारांची सोन्याची पोत जबरी हिसकावून पसार झाले. महिलेने आरडाओरड केली परंतू तोपर्यंत दोन्ही संशयित हे दुचाकीवरून फरार होण्यात यशस्वी झाले.महिलेने तात्काळ याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून दोघं संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देखमुख करीत आहे.