Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वसंतवाडीच्या मराठी शाळेत वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात !
    जळगाव

    वसंतवाडीच्या मराठी शाळेत वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात !

    editor deskBy editor deskJuly 1, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील मराठी शाळेत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका योगिता हटकर यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दशरथ चव्हाण हे होते त्यांचे हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती सोनार मॅडम, शिक्षिका पौर्णिमा भामरे, योगिता हटकर अंगणवाडी सेविका कमल चव्हाण तसेच जळके वि.वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन प्रविण पाटील, वसंतवाडी ग्रामपंचायत माजी उपसरपंच गजमल पवार, जळके वि.वि.का.सोसायटीचे सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण, शालेय शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष भंगु चव्हाण , शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष भुरा चव्हाण, सदस्या, कविता चव्हाण, मनिषा चव्हाण,छाया चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते सिताराम पवार, विलास चव्हाण ,किनोद चव्हाण , ग्रामपंचायत शिपाई रामेश्वर चव्हाण व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी आपल्या मनोगतात वसंतराव नाईक साहेबांच्या जीवनातील काही प्रसंगांच्या आठवणी सांगितल्या त्यात नाईक साहेबांनी ज्याप्रकारे कठीण परिस्थितीत आलेल्या प्रसंगांवर मात करून आपले कार्य पुढे चालू ठेवले त्याच प्रमाणे आपण वसंतराव नाईक साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजपयोगी कार्य करत रहावे असे सांगितले वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तर्फे देण्यात आलेल्या वह्यांचे वाटप मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती सोनार मॅडम यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अमळनेरात कॉपी रोखली म्हणून संताप; होमगार्डवर रॉडने हल्ला

    March 21, 2026

    कामचुकार बीएलओंवर प्रशासनाचा दणका; सात जणांवर थेट गुन्हे

    March 21, 2026

    ‘बारा गाड्या’ सोहळ्यात दुर्दैवी अपघातात एकाचा दुर्देवी मृत्यू !

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.