Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघातात २६ प्रवाशी गतप्राण !
    क्राईम

    समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघातात २६ प्रवाशी गतप्राण !

    editor deskBy editor deskJuly 1, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुलढाणा : वृत्तसंस्था 

    राज्यातील बुलढाणा येथील  समृद्धी महामार्गावर काल मध्यरात्री मोठा आणि भीषण अपघात झाल्याची बातमी आली आहे. एक खासगी बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यामुळे बसमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. या आगीत बसमधील 26 प्रवाशी होरपळून जागीच गतप्राण झाले. तर आठ जणांना आपले प्राण वाचवण्यात यश आलं आहे. मात्र, या आठही जणांना जबर मार लागला आहे. अपघातानंतर बस पेटल्याने बसचा जळून कोळसा झाला आहे. काल प्रवाशांनी खच्चून भरून निघालेल्या या बसचा आज केवळ सांगाडाच उरला आहे.

    विदर्भ टॅव्हल्सची ही खासगी बस काल संध्याकाळी 5 वाजता नागपूरहून पुण्याकडे निघाली होती. या बसमध्ये दोन चालक होते. एका चालकाने कारंजापर्यंत ही बस चालवली होती. रात्री ही बस कारंजा येथे थांबली होती. यावेळी सर्व प्रवाशांनी कारंजा येथे थांबून जेवण केलं होतं. सर्व प्रवाशी जेवल्यानंतर ही बस पुण्याच्या दिशेने निघाली. जेवणानंतर काही प्रवासी झोपी गेले होते. काही प्रवासी गप्पा मारत होते. तर काही प्रवासी लहान लेकरांना झोपू घालत होते.

    ही बस बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ आली. समृद्धी महामार्गावरून ही बस जात होती. त्यावेळी रात्रीचे एक ते दीड वाजला होता. त्यामुळे सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. ही बस पिंपळखुटा गावाजवळ येताच एका खांबाला धडकली. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे ही बस पुढे असलेल्या डिव्हायडरला धडकली. त्यामुळे बसच्या टँकची डिव्हायडरला धडक लागली आणि टँक फुटला. त्यामुळे स्फोटाचा आवाज झाला अन् अचानक आग लागली.
    त्यानंतर तरीही बस डिव्हायडरला घासत पुढे गेली आणि पलटी झाली. त्यामुळे प्रवाशांना बसमधून बाहेर पडणं कठिण झालं. तर एक चालक आणि इतर सात प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बसमधून बाहेर पडत स्वत:चे जीव वाचवले. रात्रीची वेळ असल्याने त्यांना इतर प्रवाशांचे जीव वाचवता आले नाही.

    आगीने बघात बघता रौद्ररूप धारण केलं. त्यामुळे बसमधील 26 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. या बसचा एक चालक दगावला आहे. तर दुसरा चालक शेख दानिश शेख इस्माईल हा बचावला आहे. बस पूर्णपणे जळून खाक झाली असून बसचा केवळ सांगाडा उरला आहे. ही बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.

    अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दुर्घटनेची माहिती कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.