लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ-मुक्ताईनगर फोरवे हायवे रोड वरील गरीब नवाज ढाबा जवळ 31लाखाचे बायो डिझेल, साधन सामुग्री सह तीन जणांविरुद्ध बायो डिझेलची काळया बाजारात चोरटी विक्री करण्याचा गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेने रॅकेट उघकीस आणले.
जिल्हयांत बायो डिझेलचा काळाबाजार करणारी टोळी सतर्क असल्याबाबत बातमी मिळाली होती. एलसीबीचे किरणकुमार बकाले सपोनि. जालिंदर पळे, सफौ युनुस शेख इब्राहिम, पोहवा सुनिल पंडीत दामोदरे, पोहवा दिपक शांताराम पाटील, पोना रणजित अशोक जाधव, पोना किशोर ममराज राठोड, पोकॉ श्रीकृष्ण देशमुख,पोना दर्शन हरि ढाकणे, पोहेकॉ भारत शांताराम पाटील या पथकाने २७ रात्री सापळा रचून भुसावळ-मुक्ताईनगर फोरवे हायवे रोड वरील गरीब नवाज ढाबा जवळील बायो डिझेलची काळया बाजारात चोरटी विक्री करणारे यांनी २ टॅकर टाक्यात जमीनीत पुरुन त्यात बायो डिझेल व सदर टाक्यामध्ये बायो डिझेल भरले ते टॅकर क्र.डीएन ०९/जे ९६६३ त्यात उर्वरित बायो डिझेल असे अवैध रित्या बायो डिझेलचा साठ करुन त्याद्वारे पाईप लाईन तयार करुन एक डिस्पेन्सर मशिन नौझेल व त्यावर मिटर असलेल्या मशिनद्वारे
ट्रक मध्ये बायो डिझेल भरतांना आरोपी युसूफ खान नुर खान (वय ५४ रा.सिध्देश्वर नगर वरणगाव ता.भुसावळ,)आरोपी कामगार ,आफताब अब्दुल कादर राजकोटीया( वय २१ रा. हिना पार्क वरणगाव मुळ रा.हुसेनी चौक ४२० टकिया स्टेट कालावड जि.जामनगर, गुजरात),आरोपी टॅकर चालक बेचु मौर्या चंद्रधन मौर्या (वय ४१ रा.खरगपुर पोस्ट मेहनगर आजमगड उत्तर प्रदेश मिळून आले.
त्याठिकाणा बायो डिझेल विक्री करण्यासाठी लागणारे साधन सामग्री, टॅकर व बायो डिझेल २५००० लिटर २० लाख ,७५ हजाराचे बायो डिझेल, 10 लाख चे एक टॅकर व डिस्पेन्सर, नौझेल मशिन, पाईप, व इतर साहित्य असा एकूण १लाख २०हजार ७०० रुपयाचा असा एकूण ३१लाख ९५ हजार ७०० रुपयाच्या मुद्देमालासह याच्या विरुध्द वरणगाव पो.स्टे.ला सीसीटीएनएस नंबर १८६/२०२१ अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम-३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.