Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगावात धाडसी घरफोडी ; लाखोंचा मुद्देमाल लंपास !
    क्राईम

    चाळीसगावात धाडसी घरफोडी ; लाखोंचा मुद्देमाल लंपास !

    editor deskBy editor deskJune 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    शहरातील प्रसिद्ध जमीन व्यावसायीकाकडे चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली तसेच काही अंतरावरील आर.के.ज्वेलर्स शॉप फोडण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने ज्वेलर्स मालक राकेश मोरे यांना जाग आल्याने चोरटे पसार झाले. या घटनेने चाळीसगाव शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस सीसीटीव्ही आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अनिल वामनराव विसपुते हे जमीन व्यावसायीक असून त्यांचे कुटूंब २७ रोजी गावाला गेल्याने घराला कुलूप होते. गुरुवार, 29 रोजी सकाळी साडे सात वाजता विसपुते हे घरी आल्यानंतर त्यांना मुख्य दरवाज्याचे सेंट्रल लॉक व कड्या तुटलेल्या दिसल्याने त्यांनी पोलिसांना सूचित केले. चोरट्यांनी घरातील दोन्हीही बेडरूमच्या दरवाज्याचे लॉक तोडत कपाटातील सुटकेसमधील चांदीचे शिक्के व रोख रक्कम लांबवली. त्यात 97 हजार 200 रुपयांची रोकड, दोन हजार रुपये किंमतीचे 40 ग्रॅम वजनाचे चांदीचे चार शिक्के, 20 हजार रुपये किंमतीचे 500 ग्रॅम वजनाचे चांदीचे एक ताट, दोन हजार 500 रुपये किंमतीचे 50 ग्रॅम वजनाचे चांदीचे एक लॉकेट असा एकूण 1 लाख 21 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.

    चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल टकले, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड यांनी भेट देवून पाहणी केली. जळगाव येथून श्वान पथक व ठसे तज्ज्ञ दाखल झाले होते. हॅपी श्वानाने काही अंतरापर्यंत माग काढला. अनिल विसपुते यांच्या फिर्यादी वरून शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026

    शिवरायांचा अवमान खपवून घेणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.