जळगाव (प्रतिनिधी ) ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या असून कोरोना काळात ऑनलाईन परीक्षा घेण्याचे ठरले असताना परीक्षेसाठी नवीन प्रक्रिया राबविली गेली का ? अशा विविध प्रश्नांसाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू ई वायुनंदन यांची आज भेट घेण्यात आली . यावेळी अतुल कदमबांडे ,कुणाल पवार, शिवराज पाटील, विजय पाटील, रोहन सोनवणे ,आदी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी पदी नियुक्ती करताना विद्यापीठ कायदा २०१६ नुसार कलम १४ (५ ) नुसार प्रभारी वित्त व लेखाधिकारी प्रा. डॉ. मधुलिका सोनावणे यांची नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र हि नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. प्रभारी संवैधानिक पदासाठी वित्त व लेखाधिकारी नियुक्ती प्रक्रिया राबविताना महाराष्ट्र शासनाच्या १५ मार्च २०१३ च्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे शासन निर्णयाचे पालन केले गेले नाही म्हणून काही विशेतः हेतू ठेऊन त्यांची नियुक्ती केल्याचा आरोप या पत्रकात केला गेला आहे. बेकायदेशीर नियुक्तीबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.