Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘या’ अभिनेत्रीला बसला मोठा धक्का !
    राज्य

    ‘या’ अभिनेत्रीला बसला मोठा धक्का !

    editor deskBy editor deskJune 30, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    बॉलिवूड क्षेत्रात अनेक अभिनेत्रीमध्ये नेहमीच चर्चेत असलेली  सोनम कपूर सोशल मिडीयावर देखील चर्चेत असते. सध्या बॉलिवूड सेलिब्रेटी ओटीटीमुळे हतबल झालेले दिसत आहेत. चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर घसरण होत आहे. अशातच अभिनेत्री सोनम कपूरलाही मोठा धक्का बसला आहे. कारण तिनं कधी विचारही केला नव्हता की ज्या चित्रपटात ती काम करत आहे तो चित्रपट थेट ओटीटी रिलीजवर प्रदर्शित होईल.

    2011 च्या ‘ब्लाइंड’ या कोरियन चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये सोनम कपूर एका अंध पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा हा चित्रपट 7 जुलैपासून OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. याबाबत सोनमसोबत चर्चा झाली नसून निर्मात्यांनी हा निर्णय स्वतः घेतला आहे. तसेच नीरजा चित्रपटामुळे सोनमचं कौतुक झालं होतं. पण आता तिचा हा आगामी चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार नाहीये.

    ‘ब्लाइंड’ चित्रपटाची OTT वर थेट रिलीज करण्याची घोषणा सोनमसाठी धक्कादायक होती. कारण निर्मात्यांनी तिला सुरूवातीपासूनच हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, थिएटर मालक बॉक्स ऑफिसच्या बदललेल्या परिस्थितीत अंध चित्रपटाच्या निर्मात्यांच्या अटी मान्य करायला तयार नव्हते. त्यामुळे निर्मात्यांकडे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच वरूण धवन आणि जान्हवी कपूरचा बावल हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या समजताच प्रेक्षक आश्चर्यचकित झाले होते. कारण हा चित्रपट महागडा असल्याचं सांगितलं जात असून त्याचं बजेट 275 कोटी असल्याचं समजतंय.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.