• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आदित्य ठाकरेंचा मित्र करणार शिंदे गटात प्रवेश !

editor desk by editor desk
June 30, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
आदित्य ठाकरेंचा मित्र करणार शिंदे गटात प्रवेश !

मुंबई : वृत्तसंस्था 

१ जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याची तयारी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे करत आहेत. तर त्याचदिवशी त्यांना शिंदे गटाच्या शिवसेनेकडून जोर का झटका दिला जाणार आहे.

आदित्य ठाकरेंचे खास मित्र आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्य 1 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचा मोठा कार्यक्रम असताना ठाकरेंना धक्का देण्याची परंपरा मुख्यमंत्र्यांनी सुरूच ठेवली आहे.आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राहूल कनाल यांनी महिन्यापूर्वी युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप सोडला होता. शिवसेनेत येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राहूल कनाल युवासेनेत नाराज असल्याची चर्चा आहे. राहुल कनाल हे आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे विश्वासू समजले जातात. राहुल कनाल कोअर कमिटीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट झाले आहेत. अंतर्गत कुरघोडींना कंटाळून राहुल कनाल बाहेर पडल्याची चर्चा आहे. मविआची सत्ता असताना शिर्डी संस्थानवर कनाल यांची विश्वस्त म्हणून वर्णी लागली होती. युवा सेनेतल्या अमेय घोले, सिद्धेश कदम, समाधान सरवणकर यांनीही नाराजी व्यक्त करत युवा सेना सोडली होती. राहुल कनाल हे वांद्रे पश्चिममधून विधानसभेसाठी तयारी करत होते.

मुंबई महापालिकेत शिवसेनेला पहिलं खिंडार पडलंय. शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदे गटात दाखल झाल्या आहेत. शिंदे गटात प्रवेश करण्याच्या 20 दिवस आधी अलिबागमध्ये शीतल म्हात्रेंनी शिंदे गटाला इशारा दिला होता. आता, मात्र त्यांनी अचानक भूमिका बदलत थेट शिंदे गटातच प्रवेश केल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मुंबईतले इतरही नगरसेवक लवकरच शिंदे गटात येणार असल्याचा दावा म्हात्रेंनी केलाय. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला लागलेली गळती सुरूच आहे. ठाणे आणि नवी मुंबईपाठोपाठ आता उल्हासनगर महापालिकेतल्या नगरसेवकांनीही उद्धव ठाकरेंना धक्का दिला. उल्हासनगरचे शिवसेनेतील 15 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले होते. ठाण्यात आनंद आश्रमात या नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश केला.

Tags: #aaditythaakre#cmshinde#shivsena
Previous Post

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्मुला ठरला : मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री मध्यरात्री दिल्लीत !

Next Post

‘या’ अभिनेत्रीला बसला मोठा धक्का !

Next Post
‘या’ अभिनेत्रीला बसला मोठा धक्का !

'या' अभिनेत्रीला बसला मोठा धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

काही महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने तुमचे मनोबल आणि धैर्य वाढणार !

June 27, 2025
माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group