लवकरच होणार कामाला सुरुवात ; शिवसेनेचे प्रवक्ते पी.एम.पाटलांनी दिली माहिती
धरणगाव तालुक्यातील विध्यार्थी व तरूणासाठी क्रीडा मंत्री गिरीशभाऊ महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने क्रीडा संकुलसाठी ५० लाख रुपयांच्या निधी मंजूर केला असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते पी.एम.पाटील सर यांनी आज दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने धरणगाव तालुका क्रीडा संकुलसाठी पन्नास लाख रुपयांच्या निधी मंजूर केला असून लवकरच अपूर्ण कामाला सुरुवात होऊन विद्यार्थ्यांसाठी खुले केले जाईल जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्वच क्रीडा संकुल निधी अभावी कात टाकत होते धरणगाव तालुका क्रीडा संकुल साठी शिवसेना-भाजप युतीचे पदाधिकारी तसेच क्रीडा शिक्षक प्रामुख्याने पी एम पाटील सर, संजय महाजन, भानुदास आप्पा विसावे,पप्पू भाऊ भावे, विजय भाऊ महाजन, कैलास माळी सर, तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी सर, विलास महाजन,वाल्मीक पाटील,रविभाऊ कंखरे पदाधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांची भेट घेऊन धरणगाव तालुका क्रीडा संकुल साठी तात्काळ निधी मंजूर करून द्यावा व क्रीडा संकुल तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन हे सगळ्यांसाठी खुले करावे असे निवेदन देऊन मागणी केली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी क्रीडामंत्री गिरीशभाऊ महाजन यांची भेट घेऊन धरणगाव तालुका सह जळगाव जिल्ह्यातील सर्व क्रीडा संकुल यांना तात्काळ निधी मंजूर करून विद्यार्थ्यांसाठी ते खुले करावे अशी विनंती करून निधी मंजूर करून घेतला बांधकाम विभागाचे एस डी पाटील साहेब,लोकेश महाजन, कैलास पाटील,प्रथमेश पवार,पी एम पाटील सर विद्यापीठ खेळाडू रवींद्र कंखरे यांनी भेट घेऊन प्रत्यक्ष क्रीडांगणावर जाऊन क्रीडा संकुलाची पाहणी केली तर जे जे अपूर्ण राहिले कामे आहेत ते 50 लक्ष निधीमध्ये कसे पुरे होतील व पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या आधी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा संकुल कसे अवेलेबल होईल या संदर्भात चर्चा करून लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी या संदर्भात चर्चा करण्यात आली. सुरुवातीला शालेय क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक असणारे 200 मीटरचे ट्रॅक हॉलीबॉल खो-खो कबड्डी यांच्या क्रीडांगण तयार करून त्याच्या प्रस्ताव तात्काळ तयार करून जिल्हा क्रीडा अधिकारी कडे पाठवून द्यावा व लवकरात लवकर काम कसे सुरू होईल. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे ठरवण्यात आले क्रीडा संकुलाची परिस्थिती कशी आहे हे सर्व धरणगावकरांना मीडिया मार्फत माहिती आहे.
त्यामुळे आता भविष्यात सर्वांनी सहकार्य करावे जेणेकरून धरणगाव तालुक्यातील सर्व खेळाडूंना क्रीडा संकुलाच्या लाभ घेता येईल धरणगाव तालुका क्रीडा संकुल अद्यावत होण्यासाठी जवळजवळ चार ते पाच कोटी रुपयांची आवश्यकता असून पुढील काळात याचा पाठपुरावा करून पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब व क्रीडामंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या सहकार्याने अद्यावत अशा स्विमिंग पूल तालुका क्रीडा कार्यालयाची बिल्डिंग याची कामे केली जातील पन्नास लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल मा.गिरीशभाऊ महाजन, ना.गुलाबराव पाटील यांचे शिवसेना भाजप युती पदाधिकारी सर्व तालुक्यातील क्रीडा शिक्षकांनी आभार मानले.