चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपरखेड गावात दि.२७ रोजी मंगळवारी गौण खनिजाचे डंपर अचानक मागे आल्यानंतर त्याखाली वडिलांचा दबून मृत्यू झाला तर सुदैवाने पित्याने मुलाला बाजूला ढकलल्याने मुलगा बचावला. यात दादाभाऊ जयसिंग गायगवाड (वय ५०) असे मयत पिता तर सागर गायकवाड (१९) असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव ते धुळे मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून पिंपरखेड धरण परीसरातून मुरूम नेला जात आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या धरण सुमारास पिंपरखेड धरण परीसरातून डंपर (एम.एच.20 ई.जी. 6512) हा उभा असताना या डंपरच्या पाठीमागून दुचाकीने दादाभाऊ गायकवाड हे मासेमारी करून घराकडे जात होते. डंपर चालकाने अचानक डंपर मागे घेतल्याने डंपर मागे असलेल्या गायकवाड यांच्या दुचाकीला जबर धडक बसली. यावेळी दादाभाऊ गायवाड यांनी दुचाकीवरून आपला मुलगा सागर याला बाजूला ढकलल्याने तो बचावला मात्र, दादाभाऊ यांचा मात्र मृत्यू झाला. अपघातांनतर चालकाने डंपर सोडून पळ काढला.
चाळीसगाव तालुक्यातील हातले येथील दादाभाऊ गायकवाड हे मुलगा सागरसह मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. दादाभाऊ हे नेहमीप्रमाणे मुलगा सागरसह पिंपरखेड धरणात मासे पकडण्यासाठी आले असता घरी परतताना हा भीषण अपघात झाला. डोळ्यादेखत वडीलांचा अपघातात मृत्यु झाल्याने सागरला मोठा धक्का बसला. घटनास्थळी त्याचा आक्रोश मन हेलावणरा होता. गायकवाड यांच्या पश्चात पत्नी व दोन मुल असा परीवार आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात डंपर चालकाविरोधात मुलगा सागर याच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला.