धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातून राहत्या घरासमोरून अनोळखी इसमाने ५० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील संजय नगर परिसरातील रहिवासी अनिल चावदास माळी(वय ४३) हे दि. २० रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर दुचाकी एम.एच.१९.डीडी.३७९९ क्रमांकाची लावलेली असतांना रात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाने हि दुचाकी चोरून नेल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी अनिल माळी यांनी धरणगाव पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना.प्रमोद पाटील हे करीत आहेत.