मुंबई : वृत्तसंस्था
अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावत पावसामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचलं तर काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसुन आलं आहे. तर काही ठिकाणी झाडे उन्मळुन पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. राज्यभरात मान्सून सक्रिय झाला असुन वीज कोसळण्याच्या झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबईतही जोरदर पाऊस सुरु आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. आजही मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातही आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह विदर्भातील जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.