Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्नानंतर संबध ठेवण्यास दिला नकार ; धक्कादायक कारण आले समोर !
    क्राईम

    लग्नानंतर संबध ठेवण्यास दिला नकार ; धक्कादायक कारण आले समोर !

    editor deskBy editor deskJune 28, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशातील अनेक भागात सध्या लग्नाचा मुहूर्त संपण्यात आलेला असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर नववधूने अनेक दिवस संबंध ठेवण्यास नकार देताना नवऱ्याला जवळही येण्यास दिले नाही. ज्यावेळी नवऱ्याने जबरदस्तीने स्पर्श केला. त्यावेळी ती भडाभडा बोलत राहिली. ज्यावेळी तिने काही सांगितले, त्यावेळी नवऱ्याच्या पाया खालची वाळूच सरकली. नवऱ्याला कळले की, ती आधीच विवाहित आहे. तिने नवऱ्यालाच धमकी दिली. जबरदस्ती केलीस तर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची नववधुने धमकी दिली. त्यामुळे पतीला आता काय करायचे याचा मोठा धक्का बसला.

    राजस्थानमधील जयपूरमधीळ ही धक्कादायक घटना समोर आली आहे. नववधूने अनेक दिवस आपल्या पतीशी गोडबोलून शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. मात्र, आपली पत्नी सातत्याने असं का वागते, याचा विचार करत तो राहिला. एके दिवशी त्याने तिला जबरदस्तीने स्पर्श केल्यावर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी तिने दिली. तसेच माझे आधीच लग्न झाल्याचेही तिने सांगितले. आता पतीने थेट पोलीस ठाणे गाठले आणि आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

    जयपूरच्या मुहाना पोलीस हद्दीत राहणाऱ्या वऱ्हाडीमंडळींसोबत नवरीने एवढी मोठी फसवणूक केली आहे की आता पती पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. सुमारे 4 लाख रुपये खर्चून त्याने लग्न केले. ही रक्कम वधूच्या कुटुंबीयांना देण्यात आली. वधूही घरी आली पण तिला हनिमून करण्यास सातत्याने तिने नकार दिला. आपले व्रत आहे. तसेच आपल्याला नवस फेडायचा आहे. असे सांगून पतीला दूर ठेवत गेली. पण जेव्हा वराने जबरदस्तीने स्पर्श केला. त्यावेळी तेव्हा ही जबरदस्ती त्याच्यावर भारी पडली. आता नववधूने त्याला अनेक प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आहे. माझ्याकडून तू पैसे घेतले असून आता आणखी पैसे मागत आहेत. तसेच बलात्काराच्या गुन्हातही अडकवण्याची तिने धमकी दिली.

    आता वराला कळून चुकले आहे की, ती आधीच विवाहित आहे. म्हणून त्याने आता पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मुहाना पोलिसांनी सांगितले की, खासगी कंपनीत काम करणारे छोटे लाल यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी सांगितले की, राजू नावाचा तरुण मुहाना परिसरात त्यांच्या कारखान्याबाहेर चहाची गाडी लावायचा. काही दिवसांपूर्वी छोटे लालने राजू यांच्याशी लग्नाचा विषय काढला. लग्न होत नसल्याचे बोलून दाखवले. अनेक स्थळे येतात पण काही लग्न जमत नाही. अशा स्थितीत माझं वयही पस्तीस वर्षे होत आले आहे.
    राजूने सांगितले की, त्याच्या एका मित्राची बहीण कुमारी आहे. दीपक असे त्या मित्राचे नाव आहे. त्यानंतर राजू छोटूलालला घेऊन दीपकच्या घरी गेला. तिथे त्याची बहीणीशी भेट झाली. लग्नासाठी सुमारे चार लाख रुपये कुटुंबाला देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी लग्नही झाले. लग्नानंतर बरेच दिवस नववधुने छोटे लाल याला जवळ येऊ दिले नाही. तिची काही दिवसांची इच्छा आहे, ती पूर्ण झाली की संबंध ठेवता येईल, असं ती सांगत होती. पण जेव्हा बरेच दिवस उलटून गेले, तेव्हा छोटे लालने जबरदस्तीन स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नववधुने सांगितले की, मी आधीच विवाहित आहे. या प्रकरणावरुन मोठा गोंधळ उडाला. आता छोटे लाल याने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर वधुविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याची पत्नी त्याला उलट बलात्कार, हुंडा प्रकरणात अडकवण्याची धमकी देत ​​आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.