• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ठाकरे गटाला मानहानी भोवणार ; ठाकरे, राऊतांना न्यायालयाचा समन्स !

editor desk by editor desk
June 28, 2023
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
ठाकरे गटाला मानहानी भोवणार ;  ठाकरे, राऊतांना न्यायालयाचा समन्स !

मुंबई : वृत्तसंस्था 

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणात न्यायालयाकडून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून हे समन्स बजावण्यात आले. दोघांनाही 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सामना या वृत्तपत्रात आपल्याबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. याविरोधात त्यांच्याकडून मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आला आहे. येत्या 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दंडाधिकारी न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना या प्रकरणाचा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 अंतर्गत तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी शेवाळे यांना बोलावून त्यांचा जबाब नोंदवला. शेवाळे यांनी ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख पुरावा म्हणून सादर केला. न्यायालयीन कामकाजादरम्यान, असा युक्तिवाद करण्यात आला की शेवाळे यांनी आपले जीवन शिवसेनेसाठी समर्पित केले आहे. मात्र खासदार म्हणून खोट्या रिअल इस्टेट दाव्यांमुळे त्यांना गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागले आहेत. जर तुम्ही म्हणत असाल की त्यांचा पाकिस्तानमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे, तर त्याचा अर्थ त्या देशाशी त्याचे चांगले संबंध आहेत. हे अत्यंत अनादरकारक आहे असा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला

Previous Post

येत्या काही तासात १९ राज्यात मुसळधार पावसाची शक्यता !

Next Post

मोठी बातमी : खान्देशात होणार विभागीय आयुक्त कार्यालय ; मुख्यमंत्री शिंदे !

Next Post
मोठी बातमी : खान्देशात होणार विभागीय आयुक्त कार्यालय ; मुख्यमंत्री शिंदे !

मोठी बातमी : खान्देशात होणार विभागीय आयुक्त कार्यालय ; मुख्यमंत्री शिंदे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group