मुंबई : वृत्तसंस्था
देशात जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात पावसाने आगमन केले असून उत्तर-पश्चिमी राज्यांमध्ये आतापर्यंत मान्सून हंगामात सरासरीपेक्षा ४६ टक्के जास्त पाऊस झाला आहे. देशाच्या पूर्व, मध्य, उत्तर-पश्चिम आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये मान्सून चार दिवस सक्रिय राहील.
पुढील २४ तासांत १९ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील शिमला येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने हिमाचलमध्ये पुढील ४ दिवस पावसाचा इशारा दिला आहे. काही भागात मुसळधार पाऊसही पडू शकतो. दोन दिवसांपूर्वी हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात ४८ तासांच्या कालावधीत भूस्खलनाच्या दोन घटना घडल्या. त्यामुळे चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग-21 दोन ठिकाणी तासनतास बंद होता. या मार्गावरील ठप्प 20 तासांनंतर उघडले. राज्यात मुसळधार पावसामुळे सुमारे ३०१ रस्ते बंद झाले होते, ते आता खुले करण्यात आले आहेत.