मुंबई : वृत्तसंस्था
एकदिवसीय विश्वचषकाचे 48 सामने भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान 46 दिवस खेळवले जातील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबरला न्यूझीलंड-इंग्लंड सामन्याने होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या मैदानावर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत.
या स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेचा सामना म्हणजेच भारत-पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. मात्र, भारताच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने होणार आहे. 8 ऑक्टोबरला चेन्नईत हा सामना खेळवला जाणार आहे.
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे पाठवला होता. मसुद्यानुसार या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये १९ नोव्हेंबरला होणार आहे. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक लाख प्रेक्षक क्षमतेचा सामना होणार आहे. अहमदाबाद व्यतिरिक्त पाकिस्तानचे सामने हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता येथे होणार आहेत.