Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील नवीन बस स्थानक ते रेल्वे स्थानक दरम्यान महिलेचे सोने चोरीला !
    क्राईम

    जळगावातील नवीन बस स्थानक ते रेल्वे स्थानक दरम्यान महिलेचे सोने चोरीला !

    editor deskBy editor deskJune 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    येथे एसटीने निघालेल्या महिला व तिच्या कुटुंबीयांच्या सुटकेसमधील सोन्याचे दागिने व रोकड असा ७३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी जळगाव येथे आकाशवाणी चौकापासून तर रेल्वे स्टेशन परिसरात लांबविल्याची घटना घडली.

    जामनेर येथील अशोक नगरमधील महिला ही पती, मुले व सासूसोबत नंदुरबार येथील लग्नाला जाण्यासाठी शनिवारी एसटी स्टॅन्डवर आली. जळगावला जाणाऱ्या एसटीत बसल्यानंतर त्यांनी त्यांच्या सीटखाली चार बॅगा ठेवल्या. नेरी येथून चढलेल्या चार महिलांपैकी एक लहान बाळासह बॅगेजवळ बसली होती. आकाशवाणी चौकात त्या महिला उतरल्या. बसस्थानकावर फिर्यादी महिला ही कुटुंबीयांसोबत उतरून रिक्षाने रेल्वे स्टेशनकडे गेल्या. स्टेशनवर बॅग उघडून पहिली असता दागिने व रक्कम लांबविल्याचे लक्षात आले. यात १८ हजारांचे कानातील दागिने, १५ हजाराची चेन, १२ हजाराचे रिंग, ३ हजाराची बाळी व २५ हजार रोख असा ७३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्या. महिलेच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलिस तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.