लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव तालुक्यातील 28 वर्षीय शेतमजूर तरुणाला लग्न लावून देण्याचे आमिष।दाखवून 2 लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने घेऊन दोन जण पसार झाले आहे त्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील डामरूण येथील २८ वर्षीय तरूण शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान औरंगाबाद येथील आशा संतोष शिंदे आणि किरण भास्कर पाटील उर्फ बापू पाटील रा. आमडदे ता. भडगाव यांनी तरूणाचे लग्न लावून देतो असे सांगून तरूणाकडून २ लाख रूपये रोख व ४० हजार रूपयांचे दागिने २० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान घेवून पसार झाले. याप्रकरणी तरूणाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.