Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यात भीषण अपघात ; आठ जण ठार ; दोन चिमुकल्यांचा समावेश !
    क्राईम

    राज्यात भीषण अपघात ; आठ जण ठार ; दोन चिमुकल्यांचा समावेश !

    editor deskBy editor deskJune 26, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघात होत आहेत. दापोलीत रविवारी ट्रक आणि मॅजिक प्रवासी रिक्षाची भीषण धडक झाली. या अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 चिमुकल्यांचा समावेश आहे. आता जिल्ह्यात पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला आहे. दापोली हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ट्रक व मॅजिक प्रवासी रिक्षा यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर उपचार सुरू असताना तीन जणांचा उशिरा रात्री मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

    दापोली हर्णे मार्गांवरील आसूद जोशी आळी जवळील एका वळणावर दापोलीतून आंजर्लेकडे प्रवासी वाहतूक करणारी डमडम व दापोलीकडे येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अनिल (बॉबी) हे त्यांचे मॅजिक प्रवासी रिक्षा ( एम. एच.08.5208) हे दापोलीतून आंजर्लेकडे प्रवासी घेऊन जात असताना त्यांची वाहन आसूद जोशी आळी नजीक असलेल्या वळणावर आले. तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने बाहेरून टर्न मारला. तेव्हा मॅजिक प्रवासी रिक्षा जोरदार ट्रकवर आदळली. ट्रकने प्रवासी रिक्षाला रस्त्याच्या डाव्या बाजूला घासत नेले. हा अपघात एवढा भयानक होता की प्रवासी रिक्षामधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.

    चालकासह क्लीनरला अटकअपघाताची माहिती मिळताच दापोलीचे पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी पोलीस कर्मचारी व रुग्णवाहीका घेऊन अपघातस्थळी धाव घेतली. या अपघातात अनिल सारंग चालक वय 45 रा. हर्णे, संदेश कदम 55, स्वरा संदेश कदम, 8, मारियम काझी, 64, फराह काझी, 27 सर्व रा. अडखळ यांचा मृत्यू झाला आहे. तर वंदना चोगले (वय 34 रा. पाजपंढरी) ,व मीरा बोरकर (वय 22, रा. पाडले) यांचे उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले, तर सामीया इरफान शिरगांवकर हिचेही निधन झाले आहे. त्यामुळे एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सपना संदेश कदम वय 34, रा. अडखळ, श्रद्धा संदेश कदम, वय 14, रा. अडखळ, विनायक आशा चोगले, रा. पाजपंढरी, भूमी सावंत वय 17, मुग्धा सावंत वय 14, ज्योती चोगले वय 9 रा. पाजपंढरी यांच्यावर उपजिल्हा व खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघाताची माहिती मिळताच अडखळ, हर्णे, पाजपंढरी तसेच दापोलीकरांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अपघात घडताच ट्रक चालक व क्लीनर यांनी अपघात स्थळावरून पळ काढला. दापोली पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
    चालकाचाही मृत्यू : अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातात प्रवासी मॅजिक गाडीचे चालक अनिल उर्फ बॉबी सारंग यांचा मृत्यू झाला आहे. ते हर्णै गावचे रहिवासी होती. अपघातातील सर्व लोक अंजरले, पाजपंढरी, अडखळ या गावातील असल्याचे कळाले आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी, या अपघातात ट्रक चालकाची चुकी होती, असा अंदाज लावण्यात आला आहे.

    या अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळी स्थानिकांसह येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांनी मोठी गर्दी केली होती. काही जखमी प्रवाशांना दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही प्रवाशांना प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – मरियम गौफिक काझी, वय 6 वर्षे, स्वरा संदेश कदम, वय 8 वर्षे, संदेश कदम, वय 55 वर्षे, अनिल सारंग, वय 45 वर्षे, फराह तौफिक काझी, वय 27 वर्षे. हे सर्व अडखळ गावचे रहिवासी आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.