जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या म्हसावद पोलिस चौकीच्या हद्दीत दिनांक २४ जुनच्या मध्यरात्री चोरट्यांनी एकाच दिवशी चार गावातुन चार मोटारसायकलींची चोरी करून सर्व परिसरात खळबळ उडवून दिली आहे.
या परिसरातील जळके येथील बसस्थानक परिसरातील कृष्णा ज्वेलर्स दिनांक १२ जुनरोजी चोरट्यांनी फोडून तिजोरीसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ताजी असुन या गुन्ह्यातील चोरट्यांचा शोध लागलेला नाही तोच चोरट्यांनी एकाच रात्री विटनेर येथील विटनेर वराड रस्त्यावर गोकुळ पुंडलिक धोबी (सुर्यवंशी) यांच्या घरासमोरुन त्यांच्या मालकीची हीरो मोटार कंपनीची HF DELUXE गाडी क्रमांक MH 19 DH 7253 ही चोरी गेली आहे विटनेर पासून २ किलोमीटरच्या अंतरावर जळके येथील ग्रामपंचायत जवळील भागातील हिलाल तुकाराम चिमणकारे यांच्या मालकीची होंडा कंपनीची साईन गाडी क्रमांक MH 19 CC 1950 ही घरासमोरुन चोरी गेली येथुन अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या वसंतवाडी तांडा येथील मराठी शाळेसमोर वास्तव्यास असलेले वरजन श्रावण चव्हाण यांच्या घराच्या समोर लावलेली हीरो मोटर कंपनीची स्प्लेंडर प्लस गाडी क्रमांक MH 19 BL 4489 चोरी गेली आहे तर जळके गावापासून ३ किलोमीटर अंतरावरील रामदेववाडी गावाच्या मध्यभागी असलेल्या मराठी शाळेसमोर वास्तव्यास असलेले ज्योतमल उखा राठोड यांच्या मालकीची घराच्या फोर्चमध्ये लावलेली बजाज कंपनीची प्लेनटीना गाडी क्रमांक MH 19 DY 0467 या सर्व गाड्या २४जुनच्या मध्यरात्री चोरी झाल्याचे माहिती समोर आली आहे या परिसरातील एकाच रात्री चार गावातुन चार मोटारसायकलींची चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असुन नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे या परिसरात जळके येथील कृष्णा ज्वेलर्स फोडुन लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ताजी असतानाच एकाच रात्री चार मोटरसायकलींची धाडसी चोरी करून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे या परिसरातील गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या भागात भुरट्या चोऱ्या पासुन तर धाडसी चोरींचे सत्र थांबण्याच नांव घेत नाही. पोलिस खात्याचा वचक संपल्याचे जाहीर चर्चा नागरिकांमध्ये होत असुन हद्दीत सर्रास सुरू असलेली अवैध धंदे चर्चचा विषय ठरला आहे अशा चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरत आहे