जळगाव : प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असतांना त्यांच्या पत्नी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. शहरातील श्री ओंकारेश्वर मंदिरामध्ये जसोदाबेन मोदी शनिवारी सकाळी ९ वाजता पूजा-अर्चा केली. नित्यनियमाप्रमाणे मंदिरातील तुळशी, वडाला जल अर्पण करून त्यानंतर स्वतः जल प्राशन केले. अभिषेक व आरतीनिमित्त त्या तासभर मंदिरात थांबून होत्या. त्यांच्यासोबत बहीण, भाऊ, पोलिस सुरक्षा रक्षक व एक पायलट व्हॅन होती.
जसोदाबेन मोदी या कुटुंबातील काही सदस्य व अन्य नागरिकांसह जगन्नाथ पुरी येथे जात आहेत. दररोज सकाळी तुळशी, वडाला जल अर्पण केल्याशिवाय जल किंवा अन्न ग्रहण करीत नाहीत, अशी माहिती देण्यात आली. मंदिर संस्थानच्या वतीने जुगलकिशोर जोशी, आशा जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. पौराहित्य आशीष पांडे, राघवेंद्र पांडे यांनी केले. नंतर त्या शेगावकडे रवाना झाल्या.