• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पंकजा मुंडे संभ्रमात ; दोन पक्षांच्या मोठ्या ऑफर !

editor desk by editor desk
June 24, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
पंकजा मुंडे संभ्रमात ; दोन पक्षांच्या मोठ्या ऑफर !

मुंबई : वृत्तसंस्था 

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये होत असलेली घुसमट लपून राहिलेली नाही. काल त्यांना के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने ऑफर दिली होती. आज औवेसी यांनी माध्यमांशी बोलतांना एमआयएमने दिलेल्या ऑफरबद्दल माहिती दिली आहे.

२०१९ आणि त्याही पूर्वीपासून पंकजा मुंडे यांना भाजपमधून अंतर्गत विरोध होत आलेला आहे. हा विरोध भागवत कराड यांना केंद्रात राज्यमंत्रीपद दिल्यांतर उफाळून आला. कराडांऐवजी प्रितम मुंडे यांना मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु भाजपने खेळी केली. त्यानंतर अनेकदा पंकजांना डावलण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील वितुष्ट लपून राहिलेलं नाही. त्यातच काल त्यांना महाराष्ट्रात रुजू पाहणाऱ्या बीआरएस पक्षाने ऑफर दिली. बीआरएसचे समन्वयक बाळासाहेब सानप म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी देशभरात भाजप वाढवण्याचं काम केलं. परंतु आज त्यांची मुलगी पंकजा यांच्यावर वारंवार अन्याय होत आहे. त्यामुळे आम्ही पंकजा मुंडे यांना पक्षामध्ये घेण्यासाठी चर्चा करु, केसीआर त्यांना नक्कीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवतील. यावर पंकजा मुंडे यांची काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे आता पंकजा मुंडे संभ्रमात आहे का ? असा सवाल कार्यकर्त्या मधून उपस्थित होत आहे.

मात्र आज एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, आम्ही दोन वर्षे आधीच पंकजा मुंडे यांच्याशी बातचित केली होती. इम्तियाज जलील यांना याची कुणकुण लागली. त्यामुळे त्यांनीच त्यांच्याशी बोलणी केली परंतु त्यांनी यात लक्ष घातलं नाही. ओवैसींच्या या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एक तर पंकजा मुंडे यांचं शिवसेनेशी जवळीकतेचं नातं आहे. त्यात त्यांना या पक्षातून तर कधी त्या पक्षातून ऑफर येत राहतात. मागच्या आठवड्यात तर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र अद्यापही पंकजा मुंडे यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

Previous Post

शिक्षकाने लाज सोडली ; दारू पिऊन वर्गातच झोपला !

Next Post

३० वर्षीय तरुणीने जळगावात घेतला गळफास !

Next Post
३० वर्षीय तरुणीने जळगावात घेतला गळफास !

३० वर्षीय तरुणीने जळगावात घेतला गळफास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group