प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव तालुक्यातील बोरगाव खु येथे एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याचा रस्ता अडविला असल्याने त्याची पाहणी करण्यासाठी तहसीलदार गेले असता रस्त्याची दुरवस्था पाहता बैलगाडीतून प्रवास करीत शेत रस्त्याची पाहणी केली.
तालुक्यातील मौजे बोरगाव खु येथील शेतकरी स्वप्नील मुरलीधर पाटील यांचा शेतरस्ता गोपीचंद जामू पाटील यांनी अडविला होता याप्रकरणी स्वप्नील पाटील यांनी तहसीदारकडे शेतरस्त्याच्या मागणी साठी अर्ज केला होता या प्रकरणी मामलेदार कोर्ट अधिनियम अंतर्गत कामकाज सुरू करण्यात आले आहे. आज २६ ऑक्टोबर रोजी धरणगाव तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी सदर रस्त्याची पाहणी करणायसाठी गेले असता शेतरस्ताची दुरवस्था पाहता त्यांनी चक्क बैलगाडीतून प्रवास करत शेतरस्ता पाहणी केली .यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले
माझ्या नोकरीचा केंद्रबिंदूच शेतकरी असल्याचे व शेतकऱ्यांना रस्ताच नसेल तर ते शेती कशी कसतील म्हणून गाडीबैल प्रवास करत त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी सांगितले. यावेळी त्याच्या सोबत मंडळ अधिकारी, तलाटी व कर्मचारी उपस्थित होते.