जळगाव : प्रतिनिधी
फुले मार्केट मधील हॉकर्सला दुकाने लावू देत नसल्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे त्यांना मार्केटमध्ये व्यवसाय करू द्यावा या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मनपावर धडक मोर्चा काढला. त्यांनी 13 मजले पायी चढून अनोखे आंदोलन पद्धत राबविली.
निवेदनात असे म्हटले आहे की, मागील १ महिन्यापासून हॉकर्स बांधवांना उपासमारीची वेळ आलेली आहे. हॉकर्स बांधवावर अतिक्रमण विभागाने तीव्र कारवाई केल्याचे त्यांचे पूर्णताः व्यवसाय बंद असल्याने त्याच्या परिवाराची जीवन चक्र कोलमडले आहे. हॉकर्स जे व्यवसाय करतात संपूर्ण कुटूंबाचे उदारनीर्वाह अवलंबून असते मुलांची शिक्षणाची जबाबदारी वृद्ध आई-वडीलांची दवाखाना असो त्यामुळे हॉकर्स बांधव मानसिक तनावात जिवन आहे त्यामुळे बांधवानी आपल्या जीवनाची टोकाची भूमिका घेवू नये यामुळे आपण करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे उपायुक्त गणेश चाटे यांची भेट घेऊन केली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते व हॉकर्स मोर्चा सहभागी झाले होते.