बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील ३४ वर्षीय तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आली आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील शेलवड शिवारात जामनेर तालुक्यातील नवीदाभाडी येथील एका ३४ वर्षीय मोतीलाल भीमराव सपकाळे याने गळफास घेत आपली जीवनयात्रा बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. बोदवड तालुक्यातील सीताराम भावडू धनगर यांच्या शेताच्या बांधावरील चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने मोतीलाल सपकाळे याने बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नैराश्यातून गळफास घेतला. याप प्रकरणी नामदेव नथु सपकाळे यांच्या खबरीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस कॉन्स्टेबल विलास महाजन करीत आहे.