Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भर लग्नात नवरदेवाने केली अशी मागणी कि सर्वाना धक्काच बसला !
    क्राईम

    भर लग्नात नवरदेवाने केली अशी मागणी कि सर्वाना धक्काच बसला !

    editor deskBy editor deskJune 21, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशात अनेक धर्मात आपापल्या पद्धतीने विवाह होत असतात हे विवाह एखाद्या सणापेक्षा कमी नसतात, लग्नाशी संबंधित कामे आठवडाभर आधी सुरू होतात. संगीताबरोबरच जेवणाची तयारीही सुरू होते. नातेवाईकही लग्नाच्या तयारीत गुंततात.
    सर्वत्र आनंद असतो, पण शेवटच्या क्षणी वराने आपला रंग बदलला तर वातावरणच बदलून जातं. आनंदाचं वातावरण दु:खात बदलतं. असाच एक प्रकार राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये समोर आला आहे. लग्नानंतर पाठवणीच्या वेळी वराने अशी मागणी केली की नवरीकडील लोकांना धक्काच बसला.

    वधू पक्षाने नवरदेवाला आपली बाजू पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला, पण नवरदेवाकडील लोक त्यांच्या मागणीवर ठाम राहिले. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली. लग्न होऊन 24 तासही उलटले नव्हते तोच प्रकरण नियंत्रणाबाहेर गेलं. नवरदेवाच्या बाजूने 10 लाखांची मागणी केली गेली. मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी वधूला नेण्यास नकार दिला. यामुळे एकच खळबळ उडाली. नवरीकडील लोकांना धक्काच बसला. सर्वजण वराला समजावून सांगण्यात गुंतले, पण काही निष्पन्न झालं नाही.

    पैशाची मागणी पूर्ण होईपर्यंत वधूला सोबत नेणार नसल्याचे वराच्या नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं. वधू पक्षाच्या लोकांसोबत मारहाणही केल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी रामगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, रामगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका मुलीचं 17 जून रोजी लग्न झालं होतं. काही तासांनंतर वधूची पाठवणी होणार होती. मात्र याच्या काही वेळ आधीच वर आणि त्याच्या वडिलांनी वधूच्या कुटुंबीयांकडे 10 लाख रुपयांची मागणी केली. मागणी पूर्ण झाल्यानंतरच वधूला सोबत घेऊन जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
    यानंतर वराची आणि त्याच्या वडिलांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले दरम्यान, वराच्या बाजूच्या लोकांनी वधूकडील लोकांशी हाणामारी सुरू केली. वराच्या बाजूच्या लोकांनी वधूलाही मारहाण केल्याचा आरोप आहे. याबाबत पोलिसांना कळवले असता त्यांनीही प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. हा वाद इतका वाढला की हे प्रकरण रामगंज पोलीस ठाण्यात पोहोचलं. तत्पूर्वी, घटनेच्या दुसऱ्या दिवशी वधूपक्षातील काही लोकांनी वराच्या घरी जाऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. असं असतानाही वर आणि त्याचे वडील 10 रुपयांच्या मागणीवर ठाम राहिले. यानंतर प्रकरण चिघळलं. याप्रकरणी वधूपक्षाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. देशात हुंडा विरोधात कडक कायदेशीर तरतुदी आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026

    जळगाव मनपात दोन्ही सभापती बिनविरोध; डॉ.चंद्रशेखर पाटलांचा अर्ज दाखल !

    February 26, 2026

    शिवरायांचा अवमान खपवून घेणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.