जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी परिसरातील चटई कामगार आपल्या घरी जाण्यासाठी निघालेला असतांना कुसुंबा येथील जकातनाका येथून रिक्षात बसून रेल्वे स्थानकावर जात असतांना रिक्षाचालक व एकाने त्याला मेहरूण तलाव परिसरातील जंगलात नेत त्याच्याकडील मोबाईल व पैसे लांबविल्याची घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १७ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास जितेंद्रसिंग राम किशन मोर्या (वय- २२) धंदा-मजुरी रा. अहमददेव नागर तहसिल पटियाली जिल्हा कासगंज उत्तर प्रदेश ह.मु. साईनगर ता जि जळगाव हे एमआयडीसी एम सेक्टर येथे चटई कंपनीत काम करताता त्यांना पटीयाला उत्तर प्रदेश येथे मुळ गावी जाणे असल्यांने ते जकात नाका कुसुबा येथुन प्रवाशी रिकशाने रेल्वे स्टेशन येथे गेले होते. त्यावेळी रिक्षामध्ये रिक्षा चालक व एक इसम होता. ते तिकीट काढुन परत एमआयडीसी येथे असतांना परत त्याच रिक्षा वाल्यांने त्यांना सोडण्या साठी बसविले होते. तेंव्हा सदर रिक्षा चालकाने रिक्षा ही अजिंठा चौकाकडुन न घेता मेहरुण तलावाकडे घेउन जात होता तेव्हा ते शिक्षा चालकाला मेहरुण तलावाकडे का घेउन जात आहे असे बोलेले असता रिक्षा चालकाने त्याच्या सोबतच्या एका इसमाने मेहरुण तलाव येथुन काहि सामान आणायचा आहे. असे बोलून मेहरुण तलाव येथे असलेल्या जंगलात नेले. तेथे रिक्षा चालकाने व सोबत असलेलया इसमांने चाकुचा धाक दाखवुन त्यांच्या जवळील 15000/- रुपये किमतीचा मोबाईल व खिशातील 1000 /- रुपये काढुन घेतले होते. व प्रवाशाला तेथे सोडुन देउन रिक्षासह पळुन गेले होते. सदर बाबतीत काल दिनांक 19/06/2023 रोजी एमआयडीसी पोसटेला जितेंद्रसिंग राम किशन मोर्या वय – 22 धंदा मजुरी रा. अहमददेव नागर तहसिल पटियाली जिल्हा कासगंज उत्तर प्रदेश ह.मु. साईनगर ता जि जळगाव यांनी दिलेलया जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरची जबरी चोरी ही 01) आयुष सुवर्णसिंग तोमर, वय 21 वर्षे, रा. बोझावळा ता. खामगांव जि जळगाव, हल्ली मुक्काम. श्रीकृष्ण नगर, कुसुबा ता जि जळगाव, 2) पवन निवृत्ती लोहार, वय 20 वर्षे, रा. श्रीकृष्ण नगर, कुसुबा ता जि जळगाव ही यांनी केल्या असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांना आज रोजी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन त्यांनी गुन्हयात वापरलेली बजाज रियल कंपनीची प्रवाशी रिक्शा क्रमांक एम.एच 19 सी डब्यु 1825 ही जप्त करण्यात आली असुन त्यांना अटक करण्यात आली होती व त्यांना आज रोजी न्यायमुर्ती श्रीमती सुवर्णा कुलकर्णी याच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक २२ जून पर्यत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सरकार तर्फे अॅडव्होकेट निखील कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले असुन सदरची कारवाई ही मा. पोलीस निरिक्षक जयपाल हिरे सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि.आनंदसिंग पाटील, सफौ.अतुल वंजारी, किशोर पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, साईनाथ मुंढे अशांनी केली आरोपीताकडुन अशाच प्रकार गुन्हे उघडकीस येण्याचे शक्यता आहे.