• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अडीच महिन्यांच्या बालकाची पाच लाखात विक्री ; अनाथाश्रमावर बंदी !

editor desk by editor desk
June 21, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
अडीच महिन्यांच्या बालकाची पाच लाखात विक्री ; अनाथाश्रमावर बंदी !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था 

राज्यातील छत्रपती संभाजी नगरातून एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शहरातील शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालक आश्रमातील एका अडीच महिन्यांच्या बालकाची कॅनॉटमधील व्यापाऱ्याला तब्बल पाच लाखांना विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश दामिनी पथकाने केला. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. दिलीप श्रीहरी राऊत (५२, रा. तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी) व त्याची पत्नी सविता दिलीप राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अाश्रमावर बंदी घातली अाहे.

भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांच्या पथकाला खबऱ्याकडून शिवशंकर कॉलनीतील जिजामाता अनाथाश्रमाचा संस्थाचालक एका अडीच महिन्यांच्या बाळाची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यावरून दामिनी पथकाच्या निरीक्षक अनिता फसाटे व त्यांच्या पथकाने जिजामाता बालक आश्रमाची झडती घेतली. तेव्हा एका खोलीत साडीच्या झोळीत अडीच महिन्यांचा मुलगा झोपलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांनी आश्रमचालक राऊतची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने कबुली दिली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दिलीप राऊतने पोलिसांना हे बाळ आमच्या पैठण येथील नातेवाईक महिलेचे असून त्या आजारी असल्याने बाळ येथे ठेवल्याचे सांगितले. मात्र, त्याचा पुरावा दिला नाही. त्यामुळे पोलिस अाता बाळाच्या जन्मदात्रीचा शोध घेत अाहे. दोन आश्रमांनाच दत्तक देण्याची परवानगी : पोलिस निरीक्षक अनिता फसाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने भारतीय समाज केंद्र व साकार या दोन संस्थांनाच मूल दत्तक देण्याचा अधिकार आहे.

Previous Post

जळगावात रिक्षाचालकासह एकाने तरुणाला चाकूच्या धाकावर लुटले !

Next Post

जळगावातून वृद्धाची दुचाकी लंपास !

Next Post
शहरातून दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल

जळगावातून वृद्धाची दुचाकी लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group