• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

साखरपुड्यात चोरट्याने मारला १२ लाखांच्या दागिन्यावर हात !

चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
June 20, 2023
in क्राईम, चोपडा
0
साखरपुड्यात चोरट्याने मारला १२ लाखांच्या दागिन्यावर हात !

चोपडा : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावात साखरपुड्याची लगबग सुरू असतानाच चोरट्याने तब्बल 12 लाख रुपये किंमतीचे 26 तोळे वजनाचे दागिनेच लांबवण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना चोपड्यानजीक अकुलखेडा येथील सौभाग्य लॉनमध्ये घडली. सोमवारी दुपारी 12 ते 1.30 दरम्यान घडली. चोरी प्रकरणी पोलिसांना एकावर संशय असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

चुंचाळे देवेंद्र नारायण चौधरी (53) यांच्या मुलीचा सौभाग्य लॉन्समध्ये सोमवारी सकाळी साखरपुडा असल्याने वर्‍हाडींची लगबग सुरू असताना त्यांनी दागिणे एका बॅगमध्ये 26 तोळे वजनाचे दागिणे ठेवले होते. सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास चौधरी दागिने घेण्यासाठी गेले असता बॅगेची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर साखरपूड्यात मोठी खळबळ उडाली.

बॅगेत दोन लाखांचा सोन्याचा नेकलेस, साडेचार लाखांचा व नऊ तोळे वजनाचा मोठा सोन्याचा नेकलेस, चार लाख पन्नास हजार रुपये किंमतीच्या नऊ तोळे वजनाच्या सहा बांगड्या, 50 हजार रुपये किंमतीचे कानातले, 14 हजार रुपये किंमतीच्या साकळ्या, सात हजारांचा चांदीचा छल्ला असा एकूण 11 लाख 71 हजारांचा ऐवज होता. बॅग चोरीची माहिती मिळताच डीवायएसपी कृषिकेश रावळे, पोलीस निरीक्षक के.के.पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी देवेंद्र नारायण चौधरी (53, चुंचाळे, ता.चोपडा) यांच्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहेत.

Tags: #chopda.#criem#jalgaon
Previous Post

पालकमंत्री पाटलांना कोर्टाने दिला दणका ; इतका झाला दंड !

Next Post

विकासकामांमध्ये कधीही जात आडवी येऊ दिली नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

विकासकामांमध्ये कधीही जात आडवी येऊ दिली नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group