लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तालुक्यातील आव्हाने बांबोरी प्र.चा. येथून मोठ्या प्रमाणात गिरणा नदी अवैध वाळूचा उपसा होत असे ज्या रस्त्याने वाळूचा करण्यात येत होता आज नायब तहसीलदार मंडल अधिकारी व कोतवाल यांनी सदरचे रस्ते खोदून तो रस्ता बंद केला.
आव्हाने व बांबोरी प्र चा या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गिरणा नदीतून अवैध वाळूचा उपसा सुरू होता. ग्रामस्थांनी अनेक वेळा याबाबत तहसील कार्यालयात तक्रारी केल्या होत्या या अवैध वाळू वाहतूक मुळे अपघात झालेले आहे तसेच पाणी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अवैध वाळू उपसा ने झालेल्या डबक्यामध्ये पाणी साचून अनेकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे यामुळे हे रस्ते बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती आज आव्हाणी बांभोरी प्र.चा येथील गीरणा नदीतून अवैध वाहतूक करणारे रस्ते निवासी नायब तहसीलदार एल एन सातपुते ,मंडळ अधिकारी अमोल पाटील कोतवाल नारायण सोनवणे याच्या उपस्थित खोदण्यात येवून बंद करण्यात आले.