Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुलीकडे जाणे पडले महागात ; चोरट्यांनी केले घर साफ !
    अमळनेर

    मुलीकडे जाणे पडले महागात ; चोरट्यांनी केले घर साफ !

    editor deskBy editor deskJune 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनधी 

    एकाच शहरात वडील व मुलीचे घर असल्याने वडील सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मुलीच्या घरी गेले असता चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास वडिलांच्या घरात धुमाकूळ घालीत हजारो रुपयाच्या  सोन्यासह रोकड लंपास केल्याची घटना अमळनेर शहरात घडली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेर शहरातील ढेकू रोड परिसरातील शास्त्री नगरातील स्वामी समर्थ रो हाऊस मधील घर नंबर तीन मधील रहिवासी प्रमिला हरिश्चंद्र वाडेकर (वय ५४) यांचे पती दिनांक १८ जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मुंदडा नगरातील मुलीकडे गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरात धुमाकूळ घातला होता या घरातून तब्बल ३२ हजारांच्या सोन्यासह चांदीचे दागिनेसह रोकड लंपास केल्याची घटना १९ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये चोरट्यांनी १२ हजार किमतीच्या सोन्याची चैन ७ हजार रुपये किमतीचे 4 ग्राम वजनाचे सोन्याचे पेंडल व मनी २ हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले किल्ले तर १ हजार ५०० रुपये किमतीचे चांदीचे ब्रासलेट तर १० हजारांची रोकड असा एकूण मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी प्रमिला वाडेकर यांनी अमळनेर पोलीस स्थानकात धाव घेत अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या चोरीची बातमी जशी पोलीस स्थानकात पोहोचली असता अंमळनेर शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याचोरीचा तपास सहायक फौजदार बापू साळुंखे हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026

    शिवरायांचा अवमान खपवून घेणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा

    February 26, 2026

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.