Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तलवार मागविली कुरियरने अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
    अमळनेर

    तलवार मागविली कुरियरने अन पोलिसांनी घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskJune 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    शहरातील एकाने कुरियरने तलवार मागविल्याप्रकरणी गांधलीपुरा भागातील पिता पुत्राला पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे.

    शहरात एकाने तलवार मागवल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाल्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, हेडकॉन्स्टेबल शरद पाटील, रवींद्र पाटील, दीपक माळी, सिद्धांत शिसोदे याना दुपारी दोन वाजेच्या सुमारास अर्बन बँकेच्या जवळ नाकाबंदी लावली. दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी स्टेशन रोड कडून मोटरसायकल क्रमांक एम एच १५ जी क्यू ५९०४ वर अदनान सादिक खाटीक (वय १९) रा.मिलन चिकन, लक्ष्मी टॉकीज मागे गांधलीपुरा हा पांढऱ्या गोणीत झाकून तलवार आणताना आढळून आला. त्याला विचारपूस केली असता अदनान याने वडील सादिक सुपडू खाटीक (वय ४७) यांच्या नावाने तलवार मागवल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक करून शस्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक चौकशीसाठी पोलिसांनी अदनान याची मोटरसायकल आणि भ्रमणध्वनी असा एकूण एक लाख १२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शिवरायांचा अवमान खपवून घेणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा

    February 26, 2026

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.