• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एटीएममध्ये कॅश नसल्यास बँकांना होणार १० हजारांचा दंड, आरबीआयचा नवा नियम

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 11, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
एटीएममध्ये कॅश नसल्यास बँकांना होणार १० हजारांचा दंड, आरबीआयचा नवा नियम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- एटीएममध्ये पैसै नसल्याने अनेकदा ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र या त्रासापासून आता ग्राहकांची मुक्ती होणार आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एक आदेश जारी करत एटीएममध्ये पैसे नसलेल्या संबंधित बँकेला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार असे स्पष्ट केले आहे. १ ऑक्टोबरपासून हा नवा नियम लागू होणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी जाहीर केले.

आरबीआयने सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सना एटीएममध्ये वेळोवेळी पैसे भरण्याचे निर्देश दिले आहेत. असे न केल्यास बँकांवर १० हजारांची दंडात्मक कारवाई केली जाईल. एटीएममध्ये कॅश उपलब्धतेबाबत आरबीआयने सर्व बँक अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचाकल आणि सीईओंना लक्ष ठेवण्यासाठी सुचना दिल्या आहेत. आरबीआयने नवीन आदेशात म्हटले की, एटीएम मशीनमध्ये कॅश नसल्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे बँका, व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (WLAO) एटीएममध्ये कॅश उपलब्धतेवर लक्ष ठेवावे तसेच वेळोवेळी कॅश फिल करण्यासाठी त्यांच्या यंत्रणा अधिक सक्षम कराव्यात. एटीएममध्ये किती आहे. याचे योग्य नियोजन करत वेळे मिळताच पुन्हा एटीएममध्ये पैसे टाकावेत. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार नाही.

आरबीआयने यासाठी ‘Scheme of Penalty for non-replenishment of ATMs’ या नियमाची घोषणा केली आहे. या नियमानुसार एटीएममध्ये दहा तासांहून अधिक काळासाठी कॅश नसल्यास हा नियम लागू करण्यात येणार आहे.व्हाईट लेबल एटीएम (डब्ल्यूएलए) म्हणजेच प्रायव्हेट एटीएमच्या प्रकरणातही हा दंड आकारला जाईल. असेही आरबीआयने स्पष्ट केलं. बँकांना कॅश संदर्भातील व्यवस्थापन आणि कॅश फिलिंग सिस्टम मजबूत करण्यासाठी १ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे.

Previous Post

बीएचआर घोटाळाप्रकरणी सुनील झंवरला ९ दिवसांची कोठडी

Next Post

विद्यापीठात अनेक वर्षांपासून बेकायदा नियुक्त्या

Next Post
विद्यापीठात अनेक वर्षांपासून बेकायदा नियुक्त्या

विद्यापीठात अनेक वर्षांपासून बेकायदा नियुक्त्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group