प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील नगर परिषदेचे गटनेते विनय भावे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव शिवसेना शहरात तर्फे जाहीर कीर्तन सोमवारी ठेवण्यात आले आहे या कीर्तन जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शहर शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
धरणगाव नगरपरिषदेचे नगरसेवक व शिवसेना गटनेते विनय शशिकांत भावे (पप्पू भावे) याच्या वाढ दिवसानिमित्ताने ह भ प पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर याचे 25 रोजी सॊमवरी सायंकाळी 7 वाजेला जाहीर कीर्तन ठेवले आहे
साने पटांगण, काटे बाजार धरणगाव येथे आयोजित केले आहे या कार्यक्रमाचे आयोजन हे धरणगाव शहर शिवसेना यांनी आयोजित केला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन धरणगाव शहर शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.