भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका विरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरातील २० वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह रहिवासास आहे. दि.१७ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तरुणी आपल्या घरासमोर उभी असतांना एकाने त्याठिकाणी येत तरुणीसोबत चुकीचे कृत्य केल्यामुळे तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली या प्रकरणी तरुणीने भुसावळ शहर पोलिसात धाव घेत एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एपीआय मोरे हे करीत आहेत.