Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगावात 18 लाखांचा गुटखा जप्त ; तरुणाविरोधात गुन्हा
    क्राईम

    चाळीसगावात 18 लाखांचा गुटखा जप्त ; तरुणाविरोधात गुन्हा

    editor deskBy editor deskJune 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    चाळीसगाव तालुक्यात अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणारा बोलेरो पोलिसांनी खरजई रोडवरील रेल्वे गेटजवळ ताब्यात घेत 18 लाख 32 हजार 904 रुपयांचा गुटखा जप्त केल्यानेे शहरातील गुटखा तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवार, 14 जून रोजी करण्यात आल्यानंतर शुक्रवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय गुलाब कोतकर (24 गुरुवर्य नगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, खरजई रस्त्याने चाळीसगांवकडे येणारा पिकअप (एम.एच. 19 सी.एक्स.0083) मध्ये गुटखा येत असल्याचा संशय नागरीकांना आल्यानंतर बुधवारी नागरीकांनी वाहन अडवल्यानंतर त्यातील गुटखा पाहून जमावाने वाहनाच्या काचा फोडत वाहनातील चालक अक्षय गुलाब कोतकर यास चोप दिला होता तर चाळीसगाव शहर पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी धाव घेत पिकअप पोलीस ठाण्यात आणत अन्न व औषध प्रशासनाला सूचित केले मात्र पथक न आल्याने अखेर पोलिसांनीच या प्रकरणी फिर्याद दिली. पोलीस शिपाई अमोल युवराज भोसले यांच्या फिर्यादीवरून गाडी चालक अक्षय गुलाब कोतकर (24, चाळीसगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित कोतकर याने वाहनातून गुटख्याची तस्करी होत असल्याचा संशय येवू न यासाठी वाहनाच्या कॅबीनवर शेती मालाच्या जाळ्या ठेवल्या मात्र सुज्ञ नागरकांनी संशयिताला हेरत चोपले व पोलिसांना माहिती कळवली. दरम्यान, या वाहनातून राज्यात प्रतिबंधीत 18 लाख 32 हजार 904 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून सात लाख रुपयांची बोलेरोदेखील जप्त करण्यात आली. या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.