धरणगाव : प्रतिनिधी
ग्रामीण भागात आज देखील पहाटे लवकर उठून शेतात कामासाठी अनेक शेतकरी जात असतात. पहाटेच्या सुमारास कमी असलेल्या उन्हात दुपारपर्यत काम करीत असतात. पण याच पहाटे उठून शेतात गेलेल्या शेतकरीने वखरणी केली अन त्याच शेतात गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हि घटना धरणगाव तालुक्यातील तरडे या गावात घडली आहे.
काय आहे घटना
धरणगाव तालुक्यातील तरडे गावातील रमेश विश्राम पाटील ६० वर्षीय वृद्ध शेतकरी रात्रीच्या सुमारास शेतात पाणी भरून येवून रात्री परीवारासोबत जेवण करून झोपून गेले तर पहाटे लवकर उठून शेतात वखरणी करण्यासाठी रमेश पाटील हे गेले होते. वखरणी केल्यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याच शेतात त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या पश्च्यात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. त्यांनी गळफास का केली याचे कारण अद्याप उघड झालेले नाही. या घटनेची बातमी हवे सारखी गावासह परिसरात पोहचली तशी गर्दी या शेतात पाहायला मिळाली होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.