मुंबई : वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपल्यात कोणताही विसंवाद नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला. एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे तुटेल, एवढी शिवसेना – भाजपची युती कमजोर नाही. देवेंद्र व आमची मैत्री एकदम जोरदार आहे, असे ते म्हणालेत.
शिवसेनेच्या वादग्रस्त जाहिरातीमुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर गुरुवारी या दोन्ही नेत्यांनी पालघर येथील कार्यक्रमात आपल्यात कोणताही विसंवाद नसल्याचे स्पष्ट केले. पण प्रत्यक्षात व्यासपीठावर एकत्र आल्यानंतर जवळपास 10 मिनिटे या नेत्यांत कोणताही संवाद झाला नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीसांत नक्की काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर शिंदेंनी शुक्रवारी या प्रकरणी पुन्हा या स्पष्टीकरण देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आधीचे सरकार घरी होता आत्ताचे सरकार लोकांच्या दारी जात आहे. हा फरक आहे. सगळे साहित्य दाखले आपण लोकांना देतोय हे तुम्ही दाखवत नाहीत. काल नऊ मिनीटे काही बोलले नाहीत, अबोला हे काही जणांनी दाखवले. मात्र आम्ही जोरजोरात हसलो, चांगल्या गप्पा मारल्या त्या तुम्ही दाखवल्या नाहीत, असा टोला त्यांनी माध्यमांना लगावला. एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे तुटेल, युती एवढी कमजोर नाहीये. ही युती वेगळ्या वैचारिक भूमिकेतून केलेली आहे. बाळासाहेबांनी ही युती अटलजी होते तेव्हापासून केली. वर्षभरामध्ये यामध्ये जो कोणी मिठाचा खडा टाकला होता, तो आम्ही खड्यासारखा काढून फेकून दिला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मात्र शिवसेनेची जाहिरात कोण दिली त्याचे नाव विचारले असता मुख्यमंत्र्यांनी प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. यानंतर ती जाहिरात विरोधकांनी दिली होती का? असा थेट प्रश्न माध्यमप्रतिनीधींनी विचारला, यावर बोलताना एकनाथ शिंदे हसून असू द्या ना असे उत्तर दिले.माझी आणि देवेंद्र फडणवीयांची मैत्री ही एकदम जोरदार आहे, ती अशी जाहिरातीमधून तुटणार नाही.