जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीसोबत प्रेमसंबंध असलेल्या तरुणाने निश्चित केलेला विवाह मोडण्यास भाग पाडून ब्लॅकमेल करीत या त्रासास कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यातील एका गावातील घडली होती. या प्रकरणी अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकर जामनेर पोलीस ठाण्यात गोकुळ पारधी या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात 17 वर्षीय मुलीचे संशयित गोकुळ पारधी सोबत प्रेमसंबंध होते. कुटूंबियांनी तरुणीचे अन्य तरुणासोबत लग्न निश्चित केल्याने आरोपीने पिडीतेला सांगून हे लग्न मोडण्यास सांगितले व लग्न न मोडल्यास होणार्या भावी पतीला प्रेमसंबंधाल कल्पना देईल, अशी धमकीही दिली. आई-वडिलांची बदनामी टाळण्यासाठी तरुणीने निश्चित केलेला विवाह मोडला मात्र त्यानंतरही आरोपीने ब्लॅकमेल करीत फोटो व रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पीडीतेने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना 12 मे रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. मुलीच्या आत्महत्येस संशयितच कारणीभूत असल्याने मयत पीडीतेच्या वडिलांनी आरोपी गोकुळ सुनील परधी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली. तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड करीत आहे.