मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून देशात अनेक चित्रपट आले पण त्यात जास्तीत जास्त चर्चेत असलेला ‘आदिपुरुष’ सिनेमा आज नुकताच रिलीज झाला असून या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच चित्रपटगृहांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. हैदराबादच्या सुदर्शन थिएटरमध्ये सकाळपासून शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. गर्दी इतकी आहे की पाय ठेवायलाही जागा नाही.
अनेक थिएटरमध्ये हनुमानजींसाठी एक आसनही सोडण्यात आले आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी थिएटर मालकांना चित्रपटादरम्यान हनुमानजीसाठी एक जागा सोडण्याचे आवाहन केले होते. अशी श्रद्धा आहे की जिथे रामकथा होते तिथे हनुमानजी नक्कीच असतात.
आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये आदिपुरुषच्या स्क्रिनिंगदरम्यान एक माकड थिएटरमध्ये प्रवेश करत आहे. माकड येते आणि थोडा वेळ स्क्रीनकडे बघून परत जाते. माकडाला पाहताच लोक थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या वाजवू लागले काही लोक हिंदू धर्मात माकडाला हनुमानाचे रूप मानतात. जिथे हनुमानजींचे मंदिर आहे, तिथे माकडांचा वावर दिसतो. काल रात्रीपासून आदिपुरुष सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर लोक त्यांचे अनुभव शेअर करत आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाबद्दल अनेक सकारात्मक प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. जय श्री रामच्या जयघोषाने चित्रपटगृह दुमदुमत आहे.